येत्या युवा धोरणात ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच धोरण राबवणार

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच महत्वाचे धोरण राबवणार असल्याचे सांगतानाच आम्ही निवडणूकांसाठी राजकारण करत नाहीत तर युवकांसाठी काम करतो हे युवकांना वाटले पाहिजे. तुमच्याकडून चांगले प्रस्ताव आले तर त्याचा युवा धोरणात नक्कीच समावेश केला जाईल असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ‘युवा मिशन २०२४’ या महामेळाव्यात युवकांना दिला.
युवक म्हणजे सळसळतं रक्त… मेहनती… कष्ट करण्याची जिद्द त्यांच्यात असते. या वयात त्यांच्या डोळयात स्वप्न असते… ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही त्यांची ताकद आहे… बदलत्या काळानुसार बदलायला हवे… आपण जागृत राहण्याची आवश्यकता आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी युवकांना केले.
विरोधात कोण बोलत असेल तर तात्काळ प्रतिक्रिया दिली पाहिजे पण त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही किंवा कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाही पध्दतीने खूप काही करता येते असेही अजित पवार म्हणाले.
आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. शिवसेनेसोबत आणि भाजपसोबत का गेलो त्यावर मी अनेकदा बोललो आहे. आता आपल्याला विकासावर भर द्यायचा आहे. एकाच धोरणावर अवलंबून न राहता समयसूचकता दाखवत पुढे जायला हवे असे स्पष्ट विचारही अजित पवार यांनी मांडले.
राष्ट्रवादीने नेहमीच युवकांना पुढे येण्यास मदत केली आहे. आज २५ वर्ष पक्षाला झाली आहेत. आता आपण सिल्व्हर जुबली साजरी करणार आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची युवा शक्ती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यास कमी पडता कामा नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
जगात आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे. ते अठरा – अठरा तास काम करतात. त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. ते शेतकऱ्यांना मदत करत आहेत. परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यांच्या व्हिजनचा फायदा महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.
१२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘स्वराज्य सप्ताहा’ निमित्ताने राज्यातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे. त्याचे वाचनही त्यांनी केले. तर १२ फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहात
घेतली जाणारी शपथ यावेळी युवा वर्गाला अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांच्या पाठीशी इतकी मोठी युवाशक्ती उभी रहात असेल तर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे
राज्यातील युवक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. ते का उभे आहेत याचा विचार केला पाहिजे असा टोला अन्न , नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
आज युवा मिशन मेळाव्याला स्वयंस्फूर्तीने युवक आले आहेत. मात्र कर्जत- जामखेडचे जागतिक युवा नेते आहेत त्यांच्याकडे पेडवर्कर आहेत अशी कोपरखळीही छगन भुजबळ यांनी लगावली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासंदर्भात कायदा येत आहे त्यालाही आमचा पाठिंबा असणार आहे. लहानसहान समाजाला घेऊन पुढे जावे लागणार आहे त्यावेळी विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सर्वांची शक्ती अजित पवार यांच्या पाठीशी उभी करायची आहे. शांततेतून सर्वांना घेऊन पुढे गेलात तर विजय आपलाच आहे हे लक्षात घ्या असे सांगत छगन भुजबळ यांनी ‘मत सोच तेरा सपना पुरा होगा की नही’ … जितना संघर्ष बडा होता है उसके जीवनमे अंधेरा आता नही…अशा शायरीने भाषणाचा समारोप केला.
अजितदादांवर टीका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. टिकाटिप्पणी करताना भान सोडून बोलत आहेत. दादांवर टिका करण्यासाठी काही पगारी माणसं ठेवली गेली आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना मी सन्मान देतो पण त्यापेक्षा खालच्या स्तरावरील जे पदाधिकारी आहेत ते एकेरी भाषेत दादांना बोलत आहेत. येत्या पुढच्या कालावधीत यापध्दतीने दादांच्या बाबतीत कुणी शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी युवकांना केले. In the upcoming youth policy, the policy of ‘all-round development of youth’ will be implemented
ML/KA/PGB
11 Feb 2024