विधानसभेत सत्ताधारी सदस्यांमध्येच जुंपली लढाई

नागपूर, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आगरीपाडा भागात उर्दू लर्निग सेंटर ला जागा देण्याच्या विषयावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळ झाला त्यामुळे त्यांच्यातच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले . विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर आपला जोरदार आक्षेप घेत उर्दू भवन झालेच पाहिजे अशी मागणी केली.
आयटीआय साठी राखीव असलेल्या जागेवर महा विकास आघाडी सरकारच्या काळात काही भागावर उर्दू लर्निग सेंटर उभारण्याचा निर्णय झाला, त्याचे काम ही सुरू झाले मात्र सध्या त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. ती मिहिर कोटेचा यांनी उपस्थित केली होती. त्याला नितेश राणे यांनी उप प्रश्न विचारत उर्दू भवन चे काम बंद करण्याची मागणी केली, त्याला रईस अन्सारी यांनी जोरदार हरकत घेतली. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही जागा पूर्णतः आय टी आय साठीच हवी अशी मागणी केली.
मात्र शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य यामिनी जाधव यांनी उर्दू लर्निग सेंटर आपल्या मागणीवर झालं आहे,क्टे व्हायलाच हवे अशी मागणी केली त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांमध्ये विसंवाद दिसून आला , यावर सभागृहात गदारोळ झाला, पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी पुढील लक्षवेधी पुकारली आणि पुढील संघर्ष टाळला.
ML/KA/SL
19 Dec. 2023