शहापूरात डॉ आंबेडकर वस्तीगृह थाटले भाड्याच्या घरात

 शहापूरात डॉ आंबेडकर वस्तीगृह थाटले भाड्याच्या घरात

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाणे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय  वसतिगृहाच्या इमारतीसाठी समाज कल्याण विभागास सरकारी हक्काची जागा मिळत नसल्याने जागेअभावी हे वसतिगृह चक्कं शहापूर शहरातील वाफे येथे एका भाड्याच्या इमारतीत भरविले जात आहे.वसतिगृहाच्या भाड्यापोटी समाज कल्याण विभागाला‌ इमारतीचे भाडे म्हणून दरमहा ५६ ,हजार ८४७ रुपये इतके भरावे लागत आहे.
जवळपास वर्षाकाठी ७ लाख एवढा हा सरकारी भुर्दंड समाज कल्याण विभागाला सोसावा लागत आहे.

ठाणे समाज कल्याण विभागाचे एकूण ६० मुलांचे क्षमता असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह शहापूर शहरातील वाफे येथे दिशा अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याने जागा घेऊन थाटले आहे.सनं १९९६ पासून म्हणजेच तब्बल मागील २७ वर्षांपासून समाज कल्याण विभागाचे हे वसतिगृहासाठी शहापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावरच जागा घ्यावी लागली आहे.हक्काची सरकारी इमारत नसल्याने भाड्यापोटी ६ लाख८२ हजार १६४ रुपयांचा भुर्दंड दर वर्षी समाज कल्याण विभागास सोसावा लागत आहे.सरकारी तिजोरीतून होणारा हा खर्च पाहता ठाणे समाज कल्याण आयुक्त यांनी वसतिगृहाचे गृहपाल यांना शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासाठी शासकीय भूखंड शोधण्याचे लेखी आदेश दिले आहेत त्यानुसार शहापूर आंबेडकरी वसतीगृहाचे गृहपाल मंगेश अडसूळ यांनी शहापूर शहरात शासकीय जागेची शोधाशोध सुरू केली आहे. मात्र शहापूर तहसीलदार कार्यालय,मंडळ अधिकारी तलाठी हे जागा उपलब्ध नसल्याचे करणं सांगून टोलवाटोलवी करीत आहेत.In Shahapur, Dr Ambedkar’s hostel was built in a rented house

अनेक वेळा गृहपाल अडसूळ यांनी जागेसाठी तहसीलदार कार्यालयांत लेखी पत्र व्यवहार करूनही महसूल विभागाकडून शासकीय  भूखंड देण्यास विलंब लावला जात असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडे शहापूरात डॉ मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून सरकारी निधीची तरतूद असतानाही केवळ वसतिगृह इमारतीसाठी शासकीय भूखंड मिळत नसल्याने वसतिगृहाच्या शासकीय इमारतीचा प्रश्न कित्येक वर्षे रखडून पडला आहे.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह. शहापूरचे गृहपाल यांनी सांगितले की,
वसतिगृहाच्या इमारतीसाठी जागा मिळावी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा शासकीय जमीन उपलब्ध झाली नाही.

ML/KA/PGB
6 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *