रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरूच, रस्ता खचला

रत्नागिरी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अधून मधून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी बरसत आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 74 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालेय. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात 121 मिमी एवढा झाला आहे.In Ratnagiri district, the road is blocked
दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीत वाढ होत आहे. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. रत्नागिरी नागपूर महामार्ग नानिज नाजिक खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
ML/KA/PGB
30 Jun 2023