पुण्यात आता बार वर AI कॅमेऱ्यांची नजर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात पोर्शे कार अपघातात पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून , यात कोणताही राजकीय दबाव नव्हता , मात्र ज्या लोकांनी यात हलगर्जी केली त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधी सुचनेवरील उत्तरात दिली. सुनील प्रभू आणि इतरांनी ती उपस्थित केली होती.
या घटनेनंतर पुण्यातील सर्व बार आणि पब मध्ये AI कॅमेरे बसवून दारू विक्री करण्यात येणाऱ्या गिऱ्हाईकाचे वय काय, त्याची इतर माहिती घेऊन मगच विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, याचे उल्लंघन करणाऱ्या वर कठोर कारवाई केली जाईल. पॉर्शे कार नोंदणी करून त्याचा कर न भरल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.
ML/ML/SL
28 June 2024