पाकीस्तानात गाईंच्या शेणापासून बनलेल्या इंधनावर धावत आहेत बस

कराची, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या कराची शहरात धावणाऱ्या दोनशेंहून अधिक बस या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या इंधनावर धावत आहेत. या प्रोजेक्टला ग्रीन बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) बस नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत गायींच्या शेणापासून इंधन बनवलं जातं आणि त्या इंधनावर बस धावतात. या प्रोजेक्टमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेणाला चांगला भाव मिळू लागला, तसेच पाकिस्तानची ऊर्जा समस्या काही प्रमाणात दूर होण्यास देखील मदत झाली आहे.
पाकिस्तानमध्ये गायीच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती सुरू आहे, याचा उपयोग हा वाहनांसाठी इंधन म्हणून करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानचं या प्रोजेक्टवर संशोधन सुरू आहे, ज्यामुळे देशातील प्रदूषण नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होत आहे. पाकिस्तान सरकारने गाईच्या शेणापासून एक ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला आहे.असं करणारा पाकिस्तान हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या पशु गणनेनुसार पाकिस्तानमध्ये चार लाखांहून अधिक गाई, म्हशींची संख्या आहे. जागतिक बँकेनं केलेल्या आर्थिक सहाय्याच्या मदतीनं पाकिस्तानने हा प्रकल्प सुरू केला आहे.
SL/ML/SL
17 Dec. 2024