विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार….

 विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार….

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायच्या आजच्या शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी एकूण १९ अर्ज भरले, यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली असून त्यांनीही आज अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व उमेदवारांनी आज अर्ज भरले.

विधानसभा सदस्यांमधून यापैकी ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत , साधारणपणे तेवीस ते पंचवीस मतांचा कोटा एका उमेदवारासाठी आवश्यक असणार आहे, त्यानुसार सध्या विधानसभेत असलेल्या संख्याबळानुसार भाजपचे पाच , शिवसेना , राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून जाणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस कडील अतिरिक्त मते यातून आणखी एक असे अकरा जण निवडून येऊ शकतात.

मात्र शिवसेना उबाठा पक्षाने त्यांच्याकडे चौदा आमदार असतानाही मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवले असून नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्याशी असलेले मधुर संबंध यासाठी वापरायचे ठरविल्याचे दिसत आहे. शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांच्याकडे ही तेरा , चौदा मते आहेत. काँग्रेसकडे असलेली आपला उमेदवार सोडून कोट्याबाहेरची मते कोणाकडे जातात यावर जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यापैकी एक विजयी होतात ते पहावे लागेल.

राजकारणात एक आणि एक दोन असे गणित कधीच नसते , याचा अनुभव यापूर्वी अनेक वेळा आला असून गेल्या वेळी स्वतःकडे मते नसताना ही भाजपाने प्रसाद लाड यांना निवडून आणलेच होते. जयंत पाटील ही या खेळात माहीर आहेत त्यामुळे कोण कोणाची मते फोडतो यावरच अकरावा उमेदवार विजयी होणार आहे. In Legislative Council elections, Churas, twelve candidates for eleven seats….

ML/ML/PGB
2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *