जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीची आवक वाढली…
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोसंबीची आवक वाढली आहे. मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावामुळे चिंतीत पडलेले आहेत. थंडीमुळे मोसंबीला 300 रूपयांपासून ते 1 हजार 450 रूपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. जालना बाजार समितीत एकूण सरासरी 900 रूपयांचा भाव मोसंबीला टनामागे मिळत आहे. जालन्याच्या बाजारात दररोज मोसंबीची आवक काहीशी वाढली असली तरी भाव मात्र, घसरलेलेच आहे. सध्या बाजारात 426 क्विंटल मोसंबीची आवक सुरू आहे. मात्र, पुढील महिन्यापर्यंत मोसंबीचे भाव वाढतील अशी आशा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
ML/ML/SL
22 Jan. 2025