आंध्र-तमिळनाडूमध्ये मिचौंग चक्रीवादळाच्या थैमानास सुरुवात

 आंध्र-तमिळनाडूमध्ये मिचौंग चक्रीवादळाच्या थैमानास सुरुवात

चेन्नई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवडाभरापासून देशभर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. याला कारणीभूत असलेले बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं मिचौंग चक्रीवादळ उद्या (५ डिसेंबर) तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळपासूनच या वादळाचे पूर्व परिणाम तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशाच्या किनारी भागात दिसू लागले आहेत. चक्रीवादळापूर्वीच तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रविवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते आणि घरं पाण्याखाली बुडाली आहेत.

चेन्नईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू असून सोमवारी सकाळी ईस्ट कोस्टल रोडवरील एक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत्य झालेले दोघे मूळचे झारखंडचे होते. शेख अफराज आणि एम. डी. तौफिक अशी मृतांची नावं आहेत.

मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, रस्ते बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच लोकांनी घरून काम करावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणाहून दरडी कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर चेन्नई विमानतळ बंद करण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत ६ नागरिकांचा बळी घेतला आहे.

तमिळनाडूचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. एस. एस. आर. रामचंद्रन यांनी चक्रवादळामुळे रामचंद्रन महणाले, बस अपघातात हे सहा बळी गेले आहेत. झाड पडून, पूर किंवा वीज पडून कुठेही जीवितहानी झालेली नाही.

या चक्रीवादळाबाबत हवामान विभागाच्या विशाखापट्टणम् वादळ इशारा केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालिका सुनंदा यांनी सांगितले, की

बंगालच्या उपसागराच्या र्नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा १८ किलोमीटर प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकला. हे वादळ २ डिसेंबर रोजी पुद्दुचेरीच्या ४४० किमी पूर्वेकडे, चेन्नईच्या पूर्व-आग्नेय दिशेला ४५० किमी, नेल्लोरच्या आग्नेय-पूर्व दिशेने ५८० किमी, बापट्लाच्या ६७० किमी आग्नेय-पूर्व आणि मछलीपट्टणमच्या दक्षिण-आग्नेय दिशेस ६७० किमीवर होते, हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि काही तासांत बंगालच्या उपसागरात र्नैऋत्य भागात तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते वायव्येकडे सरकेल आणि ४ डिसेंबरच्या दुपापर्यंत तामिळनाडूच्या उत्तर भागातील किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात पोहोचेल. त्यानंतर ते जवळपास उत्तरेकडे समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत सरकेल आणि ५ डिसेंबरच्या दुपारदरम्यान नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडेल. त्यावेळी चक्री वादळाच्या वाऱ्यांचा ताशी ८०-९० किमी वेगवान असण्याची शक्यता आहे. हा वेग ताशी १०० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

4 Dec. 2023

SL/KA/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *