• जेम्पेर्ली (डोस्टारलिमॅब) ही डीएमएमआर/एमएसआय-एच प्रगत एंडोमेट्रियल कर्करोगाच्या दुसऱ्या श्रेणीतील उपचारांसाठी भारतातील पहिली आणि एकमेव मान्यताप्राप्त पीडी-१इम्युनोथेरपी
मुंबई, दि २५:
जीएसकेने आज भारतात आपल्या बहुप्रतिक्षित प्रगत उपचारपद्धती जेम्पेर्ली (डोस्टारलिमॅब) आणि झेजुला (निरापरिब) उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. यातून कर्करोगासाठी विशेष उपचारांची कमतरता भरून काढण्याची त्यांची वचनबद्धता दिसून येते.
भारतातील महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहेत आणि ते वाढत आहेत. एंडोमेट्रियल आणि ओव्हरियन कर्करोग हे भारतातील पहिल्या तीन क्रमांकाच्या स्त्रीरोगविषयक कर्करोगांपैकी एक आहेत. भारतात २०४५ पर्यंत एंडोमेट्रियल आणि ओव्हरियन कर्करोगाचे प्रमाण अनुक्रमे ७८% आणि ६९% ने वाढण्याचा अंदाज आहे.
एंडोमेट्रियल कर्करोग हा गर्भाशयाच्या आतील अस्तर असलेल्या एंडोमेट्रियलमधून उद्भवणारा एक घातक रोग आहे. भारतातील जवळजवळ एक चतुर्थांश एंडोमेट्रियल कर्करोग रुग्ण प्रगत अवस्थेत आहेत. या टप्प्यावर केमोथेरपी हा एक मानक उपचार आहे परंतु तो बहुतेकदा विषारीपणा आणि दीर्घकालीन दुष्परिणामांसह येतो.
जेम्पेर्ली ही भारतातील मिसमॅच रिपेअर-डेफिशियन्सी (डीएमएमआर)/मायक्रोसॅटेलाइट इन्स्टेबिलिटी-हाय (एमएसआय-एच) अॅडव्हान्स्ड किंवा रिकरंट एंडोमेट्रियल कॅन्सरच्या दुसऱ्या-लाइन उपचारांसाठी पहिली आणि एकमेव मान्यताप्राप्त पीडी-१ इम्युनोथेरपी आहे. जेम्पेर्ली पीडी-१ मार्ग रोखून करून कार्य करते. या यंत्रणेचा वापर करून कर्करोगाच्या पेशी स्वतःचा रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्यासाठी वापरतात. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशी ट्यूमरला अधिक प्रभावीपणे शोधून त्यावर हल्ला करण्यास सक्षम होतात.
जेम्पेर्लीचा प्रभाव डीएमएमआर/एमएसआय-एच अॅडव्हान्स्ड किंवा रिकरंट एंडोमेट्रियल कॅन्सर असलेल्या रुग्णांमध्ये गार्नेट चाचणीतील वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित दिसतो. जेम्पेर्लीने ४५.५% चा प्रत्यक्ष प्रतिसाद दर साध्य केला असून १२ आणि २४ महिन्यांत अनुक्रमे ९३.३% आणि ८३.७% प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. स्वीकारार्ह सुरक्षा प्रोफाइलसह हे निष्कर्ष अशा लोकसंख्येमध्ये दीर्घकालीन क्लिनिकल फायद्याची शक्यता अधोरेखित करतात जिथे मानक केमोथेरपीने ऐतिहासिकदृष्ट्या मर्यादित कार्यक्षमता आणि दीर्घकालीन दुष्परिणाम दर्शवले आहेत.
गर्भाशयाच्या कर्करोग हा एक घातक रोग आहे. तो गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंडाशयांमधून सुरू होतो. भारतात एडव्हान्स्ड गर्भाशय कर्करोगात सर्व बायोमार्कर प्रकारांसाठी फर्स्ट -लाइन मोनोथेरपी देखभाल म्हणून झेजुला ही एकमेव पीएआरपी इनहिबिटर आहे. तिचा डोस दररोज एकदा तोंडावाटे आहे. त्यामुळे ती रुग्णांसाठी एक सोपी आणि सोयीस्कर उपचार ठरते. फेज-३ प्रायमा चाचणीच्या अद्ययावत अॅड-हॉक विश्लेषणातून असे दिसून आले की झेजुला फर्स्ट-लाइन मोनोथेरपीने नव्याने निदान झालेल्या प्रगत गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांमध्ये टिकाऊ, दीर्घकालीन आराम मिळाला. या महिलांना सर्व बायोमार्कर उपसमूहांमध्ये रोगाच्या प्रगतीचा किंवा मृत्यूचा जास्त धोका होता.
रुग्णांना या नावीन्यपूर्ण उपचार सहजसाध्य करण्यासाठी जीएसके ‘फिनिक्स’ हा एक रुग्ण आधार उपक्रम सादर करत आहे.
जीएसके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण अक्षिकर म्हणाले: “जेम्पेर्ली आणि झेजुलाचे भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणे हा जीएसके इंडियासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. आम्ही नवसंशोधनावर आधारित असलेल्या, उत्तम कामगिरी करणाऱ्या औषधांवर लक्ष केंद्रित करून ऑन्कोलॉजीमध्ये प्रवेश करत आहोत. या उपचारपद्धती भारतातील स्त्रीरोगविषयक कर्करोगातील एक महत्त्वाची गरज पूर्ण करतातच पण त्याचबरोबर महिलांमधील कर्करोगाच्या सेवेत प्रगती दर्शवतात. या उत्पादनांसह आम्ही भारतात विशेष औषध पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आमची दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवत आहोत.”
जीएसके इंडियाच्या वैद्यकीय कामकाज विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. शालिनी मेनन म्हणाल्या: “स्त्रीरोगविषयक कर्करोग हे भारतात विशेषतः ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आणि लठ्ठपणा आणि मेटाबोलिक सिंड्रोम असलेल्यांमध्ये वाढत्या सार्वजनिक आरोग्य आव्हानाचे प्रतिनिधित्व करतात. जेम्पेर्ली प्रगत किंवा वारंवार होणाऱ्या एंडोमेट्रियल कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये इम्युनोथेरपीचा समावेश करते, आणि डीएमएमआर ट्यूमर असलेल्या रुग्णांसाठी लक्ष्याधारित पर्याय देते. झेजुला प्रगत गर्भाशयाच्या कर्करोगात सोयीस्कर, फर्स्ट लाइन उपचारांची उपलब्धता वाढवते.”
बाजारात आलेल्या औषधांना अमेरिका, यूके आणि युरोपियन युनियनसह ४०+ देशांमधील जागतिक क्लिनिकल पुरावे आणि मान्यता यांचे पाठबळ आहे. भारतात जीएसके विद्यमान ऑन्कोलॉजी चिकित्सकीय चाचण्यांमध्ये भाग घेत आहे. त्याचा उद्देश नॉन-स्मॉल सेल फुफ्फुस, डोके आणि मान आणि कोलोरेक्टलसह इतर कर्करोगांमध्ये डोस्टारलिमॅबचा वापर वाढवणे आहे.
जेम्पेर्लीबाबत (डोस्टार्लिमॅब)
जेम्पेर्ली ही एक प्रोग्राम्ड डेथ रिसेप्टर-१ (पीडी-१) असून ही ब्लॉकिंग अँटीबॉडी, जीएसकेच्या चालू इम्युनो-ऑन्कोलॉजी-आधारित संशोधन आणि विकास कार्यक्रमाचा कणा आहे. एका चिकित्सकीय चाचणी कार्यक्रमात जेम्पेर्लीचा एकल आणि स्त्रीरोग, कोलोरेक्टल आणि फुफ्फुसांच्या कर्करोगातील इतर उपचारांसह तसेच तसेच परिवर्तनात्मक परिणामांसाठी संधी आहेत तिथे एकत्रित अभ्यास समाविष्ट आहे.
भारतात जेम्पेर्लीला मिसमॅच रिपेअर-डेफिशियन्सी (डीएमएमआर)/मायक्रोसॅटेलाइट इन्स्टेबिलिटी-हाय (एमएसआय-एच) रिकरंट किंवा अॅडव्हान्स्ड एंडोमेट्रियल कर्करोग असलेल्या आणि आजार पूर्वीच्या प्लॅटिनम-युक्त केमोथेरपीवर किंवा नंतर वाढलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी मोनोथेरपी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मंजुरी विद्यमान उपचार दीर्घकालीन प्रभाव आणि क्लिनिकल परिणाम दोन्हीमध्ये मर्यादित असल्यास सेकंड-लाइन सेटिंगमध्ये एक अत्यंत आवश्यक इम्युनोथेरपी पर्याय प्रदान करते.
जेम्पेरलीचा शोध अॅनाप्टीसबायो आयएनसी.ने लावला आणि मार्च २०१४ मध्ये स्वाक्षरी केलेल्या सहयोग आणि विशेष परवाना करारांतर्गत टेसारो आयएनसी. ला परवाना दिला. या करारांतर्गत जीएसके जेम्पेरली आणि टीआयएम-३ विरोधी कोबोलिमॅब (जीएसके४०६९८८९) च्या चालू संशोधन, विकास, व्यापारीकरण आणि उत्पादनासाठी जबाबदार आहे.
जेझुलाबाबत (निरापारिब)
भारतात झेजुला हे दररोज एकदा वापरले जाणारे तोंडी पीएआरपी इनहिबिटर म्हणून मंजूर केले गेले आहे. बायोमार्कर स्थिती काहीही असली तरी प्लॅटिनमवर आधारित केमोथेरपीला पूर्ण किंवा अंशतः प्रतिसाद देणाऱ्या प्रगत किंवा रीलेप्स्ड एपिथेलियल ओव्हेरियन असलेल्या रुग्णांसाठी फर्स्ट लाइन देखभाल उपचारांसाठी मोनोथेरपी म्हणून मंजूर केली गेली आहे. झेजुला रोगाच्या प्रगतीला विलंब करण्यास मदत करण्यासाठी एक सोयीस्कर आणि प्रभावी देखभाल पर्याय आहे.
जीएसके इंडियाबाबत
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसीची उपकंपनी आहे. ती एक विज्ञान-नेतृत्वाखालील जागतिक आरोग्य सेवा कंपनी असून तिचा उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रतिभा एकत्रित करून रोगाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. अधिक माहितीसाठी, GSK-India.com ला भेट द्या.KK/ML/MS