स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गाला प्रतिबंध विधेयक २०२४ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची तसंच १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे .
परीक्षा संचलित करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास दहा वर्षांपर्यंतच्या कारावसाची शिक्षा, एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची आणि संबंधित कंपनीला चार वर्षांसाठी काळया यादीत टाकण्याची तसंच दंड भरण्यासाठी कसूर केल्यास कारावासाची शिक्षा अधिक वाढवण्याची तरतूद देखील यात करण्यात आली आहे, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. तसंच संबंधित कंपनीची स्थायी मालमत्ता जप्त करण्याची आणि संपूर्ण परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. Imprisonment and fine
ML/ML/PGB
11 July 2024