Asian Games ची दिमाखदार सांगता, १०७ पदकांसह भारत पदतालिकेत चौथ्या स्थानी

 Asian Games ची दिमाखदार सांगता, १०७ पदकांसह भारत पदतालिकेत चौथ्या स्थानी

गाऊंझाऊ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

पंधरा दिवसांपासून चीनमधील गाऊंझाऊ येथे सुरु असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेची काल दिमाखदार सांगता झाली. या स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह भारताने 107 पदकांची विक्रमी कमाई करत आजवरची आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत भारत चौथ्यास्थानी विराजमान झाला आहे.यजमान चीनने 383 पदकांसह (201 सुवर्ण) पदकतालिकेत प्रथम स्थान राखले, तर जपानने (188 पदके, 52 सुवर्ण) दुसरे स्थानी आणि कोरिया प्रजासत्ताक (190 पदके, 42 सुवर्ण) तिसरे स्थान पटकावले. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमध्ये होणार आहेत.

समारोप समारंभाच्या सुरुवातीला 80 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर आपल्या राष्ट्रांचे ध्वज घेतलेल्या 45 खेळाडूंनी प्रवेश केला. सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा अनुभवी गोलरक्षक PR श्रीजेश हा भारताचा ध्वजधारक होता.

त्यानंतर ‘‘Enduring Memories of Hangzhou’ या थीमवर एक सांस्कृतिक समारंभ झाला, ही यजमान शहराबद्दलच्या चिनी कवितेची एक उत्कृष्ट ओळ आहे. दोन हजारहून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या सौंदर्यपूर्ण सांस्कृतिक परफॉर्मन्सनंतर आशियाई खेळ 2023 चे विशेष क्षण पडद्यावर दाखवण्यात आले.

त्यानंतर आशियाई खेळांची मशाल आणि OCA ध्वज 2026 आशियाई खेळांचे यजमान शहर जपानच्या नागोया-आची येथील अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या कौतुकास्पद यशानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकारकडून २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदाची तयारी करण्यात येत आहे. मला असे वाटत आहे की, भारत आता यजमानपदासाठी दावेदार म्हणून तयार झाला आहे.

SL/SK/SL

9 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *