Google Pay वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून महत्त्वाचा इशारा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगल कंपनीचं Google Pay हे भारतातील आघाडीचे UPI पेमेंट App आहे. देशातील लाखो लोक Google Pay द्वारे दररोज व्यवहार करत असतात.अन्य अनेक UPI प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असूनही गुगल वरील विश्वासामुळे वापरकर्ते Google Pay चा वापर करण्यास प्राधान्य देताना दिसतात. मात्र हे व्यवहार करताना चुक होऊन वापरकर्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गुगलने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. Google Pay च्या माध्यमातून तुम्ही कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करू शकता. कंपनी देखील ग्राहकांच्या सुविधेसाठी सातत्याने फीचर्स अपडेट करत असते. गुगलचं Google Pay हे भारतातील आघाडीचे UPI पेमेंट अॅप आहे. देशातील लाखो लोक Google Pay द्वारे दररोज व्यवहार करत असतात. परंतु हे व्यवहार करताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. गुगलने नुकताच Google Pay पेमेंट अॅप वापरताना कोणतेही स्क्रीन शेअरिंग अॅप न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
Google Pay ने ग्राहकांना सल्ला देताना म्हटले की, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतत काम करत आहोत. परंतु तुम्ही देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या वेबसाइटवर Google Pay वापरताना काही गोष्टी न करण्याचे आवाहन केले आहे. यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे Google Pay वापरताना कंपनीने ग्राहकाना मोबाईलमध्ये असलेले स्क्रीन शेअरिंग अॅप्स बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय कंपनीने असा इशाराही दिला आहे की जर तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी App वापरत असाल तर पेमेंट App वापरण्यापूर्वी ते App बंद करा. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
SL/KA/SL
22 Nov. 2023