ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

ठाणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड विस्तारलेल्या ठाणे शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्थेची नितांत गरज आहे. ठाणे स्टेशनपासून घोडबंदर रस्त्या दरम्यान होणाऱ्या प्रचंड रहदारीला ठाणेकर कंटाळले आहेत. यावर उपाय म्हणून आता ठाणे मेट्रोचे काम वेगाने सुरु असून यासाठी रिंग रोड प्रकल्पही उभारला जात आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ-टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन (GTI) सुरू केले आहे. हा महत्त्वकांक्षी कॉरिडॉर 29 किमीचा असूण यात 22 स्थानके असणार आहेत. तर यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. 2029 पर्यंत ही मेट्रो सेवेत येऊ शकते.
ठाणे इंटिग्रल मेट्रो प्रकल्प हा 29 किमी लांबीचा असून यातील 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 किमीचा मार्ग भूमिगत आहे. या प्रकल्पांतर्गंत 22 स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातीलच एक भूमिगत स्थानक थेट ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. तर, अन्य स्थानके मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.
रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीळकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटलीपाडा, आझाद नगर बस स्टॉप, मनोरमा नगर, बाळकुम नाका, बाळकुंम पाडा, राबोडी, ठाणे जंक्शन (भूमिगत) आणि नवीन ठाणे या स्थानकांचा समावेश असणार आहे.
SL/ML/SL
31 Oct. 2024