प्रसुती रजेबाबत संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय सैन्यदलामध्ये २०१९ पासून महिला सैनिकांच्या भरतीची महत्त्वपूर्ण सुरुवात झाली. त्यानंतर आता तीनही सैन्यदलांमध्ये विविध महत्त्वर्ण पदांवर महिला कार्यरत आहेत. भारतीय सैन्यात प्रसुती रजेसाठी यापुढे वरिष्ठ कनिष्ठ असा भेदभाव केला जाणार नसून सर्व महिला जवानांना समान रजा मिळणार आहे. सैन्यदल, वायूदल आणि हवाई दलातील जवानांना बालसंगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी अधिकाऱ्यांइतकीच रजा मिळणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला जवानांना मातृत्व, बालसंगोपन आणि मूल दत्तक रजेसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांइतकीच रजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे महिला जवानांच्या सैन्यातील कामाच्या स्थितीत सुधारणा होणार आहे. तसेच महिलांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
SL/KA/SL
5 Nov. 2023