चांद्रयान -३ निर्मितीत ठाण्यातील सानेबंधूंचे महत्त्वाचे योगदान
ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग करून इतिहास निर्माण केला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या या अभूतपूर्व यशामध्ये ठाणे येथील साने बंधूंच्या इंजिनिअरिंग कंपनीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चांद्रयान 3 च्या इंजिनमध्ये वापरलेला ‘फ्रिक्शन रिंग’ नावाचा सर्वात महत्त्वाचा भाग साने बंधूंच्या अभियांत्रिकी कंपनीने बनवला आहे. या गुणवत्तापूर्ण देशसेवेबद्दल इस्रोने सानेबंधूचे एका संदेशाद्वारे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
८० वर्षीय सुरेश साने यांचे ठाणे आणि शहापूर येथे अभियांत्रिकी कारखाने आहेत. याठिकाणी इस्रोच्या प्रत्येक मोहिमेत वापरले जाणारे महत्त्वाचे भाग बनवले जातात. साने यांच्या कंपनीत बनवलेल्या पार्ट्सवर इस्रोचा पूर्ण विश्वास आहे.
फ्रिक्शन रिंगचे महत्त्वाचे कार्य
उपग्रहाला अवकाशात घेऊन जाण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदणे अत्यंत आवश्यक असते अवघ्या साडेतीन मिनिटांत हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर ढकलला जातो.चांद्रयान 3 मध्ये ठाणे येथील कारखान्यात साने बंधूंनी बनवलेल्या विकास इंजिनमध्ये 6 मोठ्या आणि 4 लहान घर्षण रिंग बसवण्यात आल्या होत्या.
ML/KA/SL
26 Aug 2023