CUET-UG 2025 परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल
नवी दिल्ली,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी नुकतीच CUET-UG परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पुढील वर्षापासून CUET-UG 2025 परीक्षेत अनेक बदल होणार असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. CUET-UG देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक दिलसादायक बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात CUET-UG ला बसण्याची परवानगी असेल, मग तो विषय बारावीत घेतलेला असो वा नसो. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 5 विषयांसाठी CUET-UG मध्ये परीक्षा देता येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले की, आता विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात CUET-UG ला बसण्याची परवानगी असेल, मग ते बारावीत कोणत्याही विषयात शिकले असतील तरीही. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 5 विषयांसाठी CUET-UG मध्ये परीक्षा देता येणार आहे.
यूजीसीचे अध्यक्ष म्हणाले की, CUET-UG परीक्षा 2025 पासून केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल आणि विषयांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. यंदा एकूण विषय 63 वरून 37 करण्यात आले आहेत. यंदापासून आम्ही 20 भाषा विषय कमी करत आहोत. गेल्या वर्षी 29 डोमेन-स्पेसिफिक विषय होते आणि आम्ही ते कमी करून 23 करत आहोत.
CUET-UG परीक्षांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता परीक्षेचा कालावधी 60 मिनिटांचा असेल, तर गेल्या वर्षी काही परीक्षांची वेळ 60 मिनिटे तर काही विषयांसाठी 45 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. गेल्या वर्षी परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते, त्यापैकी 40 प्रश्नांचा पर्याय निवडण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते, मात्र यंदा सर्व 50 प्रश्न सक्तीचे असतील.
SL/ML/SL
12 Dec. 2024
12 D