विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती,विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर व्याख्यान
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे येत्या बुधवारी २१ तारखेला सकाळी ८.३० वाजता वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित ४९ वा संसदीय अभ्यास वर्गात आमदारांसाठी आयोजित प्रशिक्षणाअंतर्गत व्याख्यान होणार आहे.Importance and procedure of Bill in Legislature,
विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती, विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर त्या बोलणार आहेत.
हे प्रशिक्षण दिनांक २० ते २७ डिसेंबर, २०२२ या कालावधीत विधिमंडळात नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या आधीही त्यांनी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत आयोजित प्रशिक्षणात व्याख्यान दिले होते.
ML/KA/PGB
19 Dec .2022