मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव शमला,मात्र राज्यावर पावसाचे सावट
चेन्नई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात चैन्नईसह दक्षिण भारतात धुमाकुळ घालणाऱ्या मंदौस चक्रीवादळाचा जोर आता मंदावला आहे. हे वादळ आता उत्तर केरळमध्ये आहे असून ते नैऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची अपेक्षा आहे आणि ते पुढे भारतीय भूमीपासून दूर जाईल, अशी माहिती चेन्नई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे, उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी दिली आहे.
वादळ शमले असले तरीही महाराष्ट्रामध्ये अजून दोन दिवस अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी काल जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. अजून दोन दिवस हे पावसाचे सावट कायम राहणार असल्याने कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
SL/KA/SL
12 Dec. 2022