१०-१२ वीच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासाठी! बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, चला अभ्यासाला लागा

दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा.या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा ‘सीबीएसई’च्या पेपरवेळी आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.