आधार कार्डबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क):
सर्वोच्च न्यायालयाने जन्म तारखेसाठी आधार कार्ड वैध डॉक्यूमेंट नाही, असा निर्णय दिला आहे. यासंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या निर्णयात अपघात प्रकरणात निधन झालेल्या व्यक्तीचा आधार कार्डवरील जन्म तारीख स्वीकारण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड योजना आली तेव्हा त्या संदर्भात अनेक खटले दाखल झाले होते. परंतु न्यायालयने ते सरकारी ओळखपत्र म्हणून त्याला मान्यता दिली.
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्जल भुइया यांच्या खंडपीठाने शाळेच्या दाखल्यावर असलेली जन्मतारीख वैध असणार असल्याचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या पत्रकाच्या आधार देत खंडपीठाने म्हटले की, केंद्र सरकारने 20 डिसेंबर 2018 रोजी काढण्यात आलेल्या पत्रकात आधार कार्ड ओळखपत्र असल्याचा पुरावा म्हटले आहे. परंतु ही जन्म तारीख प्रमाण नाही.
SL/ ML/SL
25 Oct 2024