मातोश्रींच्या अंत्यसंस्कारांनंतर लगेचच पंतप्रधान मोदी कार्यरत, वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैयक्तिक सुख-दु:खा पेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी व्यक्ती अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे. आज पहाटे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे पुत्रकर्तव्य पार पाडल्यावर लगेचच पंतप्रधानानी आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावल्यानंतर मोदींनी थेट गांधीनगर राजभवन गाठलं आणि व्हीसीच्या माध्यमातून कोलकाता येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून देण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील प्रवेशद्वार असलेल्या हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला डिजिटली हिरवा झेंडा दाखवला . तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आईची अंत्ययात्रा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडली. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. आणि अत्यंसंस्कार पूर्ण होताच कुटुंबियांचे सांत्वन करून ते लगेचच आपल्या पंतप्रधान म्हणून नियोजित असलेल्या कार्यासाठी दाखल झाले. व्यक्तिगत दु:खाला मागे सारून देशाप्रतिच्या कर्तव्यांना प्राधान्य देणाऱ्या एका कणखर नेत्याचे रुप यामुळे देशवासियांना पहायला मिळाले.
SL/KA/SL
30 Dec. 2022