राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

 राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. 13 : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती IMD ने दिली आहे. नैऋत्य मान्सून संपला असला तरी आता महाराष्ट्रात परतीच्या पाऊस हजेरी लावणार आहे. १४ ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल होणार असून किमान १८ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता या वेळी हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येत आहे. जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता आहे. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असलयाचे हवामान खात्याने सांगितले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात मुसलधारेचा इशारा देण्यात आला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आल्यास हवामान विभागाने संगीतल आहे.

काढणी केलेली धान्य, कडधान्य आणि फळपिक योगय अश्या सुरक्षित ठिकाणी ठेवातीत. शेतातील पीके झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, आणि पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
SL/ML/SL
13 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *