अनधिकृत भोंग्यांसाठी आता पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार….
मुंबई दि ११ — राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवरील ३,३६७ अनधिकृत भोंगे विना फौजदारी कारवाई सामंजस्याने उतरविण्यात आले असून, यापुढे असे भोंगे पुन्हा लागल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती, एकूण अनधिकृत भोंग्यांपैकी १६०८ मुंबईत हटविण्यात आले त्यात १,१४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च आणि ४ गुरुद्वारांवर होते. राज्यात इतरत्र १,७५९ भोंगे ही हटविण्यात आले आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. ML/ML/MS