अनधिकृत बांधकामांना
संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सभागृह आक्रमक

 अनधिकृत बांधकामांनासंरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सभागृह आक्रमक

मुंबई दि १४ — राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश सर्व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत , फुटपाथवरील अतिक्रमणे देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

याबाबतचा मूळ प्रश्न पराग आळवणी यांनी उपस्थित केला होता, त्यावर योगेश सागर, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, दिलीप वळसे पाटील, राजन नाईक आदींनी उपप्रश्न विचारले. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही, यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याचा शासन निर्णय असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा करीत दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले होते.

सर्व सदस्यांनी याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे द्याव्यात त्याची यादी संबंधित मंत्र्यांना दिली जाईल आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल मंत्र्यांनी द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिले. यावर सर्व संबंधित अतिक्रमणे काढून टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आधी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

वसई विरार महापालिका हद्दीत ७,८९६ अनधिकृत बांधकामे आहेत , त्यातील ८२८ प्रकरणी कायदेशीर तर २०७ प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *