चर्चगेट येथे अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण

 चर्चगेट येथे अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण

मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : चर्चगेट येथील दिनशा वाचा रोड येथे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची बेकायदा पार्किंग केल्यामुळे नागरिकांना आणि पादचार्यांना रस्त्यावरून चालताना फार त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना रोडवरून चालावे लागत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे अनेक इमारती असल्याने बाहेरील वाहनचालक देखील येथे अनधिकृत पार्किंग करत असतात. त्यामुळे पादचार्यांना आणि स्थानिक रहिवाश्यांना पदपथावरून चालण्यास जागाच नसल्याने परिणामी त्यांना रोडवरून चालावे लागते. रोडवरून चालताना गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

या अनधिकृत वाहनाच्या पार्किंगमुळे पादचार्यांच्या अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. याच रोडवर पुढे आयकर विभागाचे कार्यालय असल्यामुळे येथे अनेक नागरिक आणि कर्मचारी याच पदपथावरून येत असतात. यामध्ये वयस्कर नागरिकही मोठ्या प्रमाणात येतात. परंतु रोडवर चालण्यामुळे एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न येथील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशी विचारत आहे. तरीही वाहतूक विभाग अशा बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनावर काहीच कारवाई करत नाही. तसेच ती वाहने टोइंगद्वारे उचलली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आम्ही वारंवार वाहतूक विभागाशी पदपथ आणि रस्त्यालगची वाहने उचालाण्यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केले परंतु आश्वासनाच्या पलीकडे काहीच कारवाई करण्यात आली नाही. तरी त्वरित वाहतूक नियंत्रण विभागाने या पदपथा समोरील आणि रस्त्यालगची पार्किंग केलेली वाहने त्वरित उचलावी आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी, पादचारी आणि कार्यालयीन कर्मचारी करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *