नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त

 नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त

नाशिक, दि. १० : CBI ने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील रहिवासी असलेल्या 6 आरोपींविरोधात तसेच अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

CBI च्या या कारवाईत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, सोने, लक्झरी कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या आरोपींनी अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचला आहे आणि अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचे भासवून बेकायदेशीर कॉल सेंटरमधून तोतयागिरी करून आणि फिशिंग कॉल/फसवे कॉल करून आर्थिक फसवणूक केली आहे.

CBI च्या कारवाईत कॉल सेंटरमध्ये काम करणारे 62 कर्मचारी लाईव्ह ऑपरेट करताना आढळले. त्यांच्याकडून परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या स्कॅमच्या माध्यमातून किती लोकांची फसवणूक झाली? यात आणखी कुणाचा हात आहे का? याची चौकशी केली जाणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *