अनधिकृत पार्किंग मुळे बेस्ट प्रवासी हैराण

मुंबई, दि 26
मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील बस स्टॉप समोर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहनांची पार्किंग केल्यामुळे बेस्ट प्रवासी अहिराणी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालय समोरच हा प्रकार घडल्याने बेस्ट प्रवासी तसेच महापालिका कर्मचारी आवक झाले आहेत. मुंबई महापालिका मुख्यालयात हजारो कर्मचारी काम करत असतात तसेच समोरच पत्रकार भवन आणि प्रेस क्लबचे कार्यालय असल्याने अनेक पत्रकार बांधव देखील या ठिकाणी बस पकडण्यासाठी या स्टॉप वरच उभे राहत असतात. परंतु गेला अनेक दिवसापासून या ठिकाणी बस स्टॉप च्या समोरच बेकायदा वाहन पार्किंग केले जात आहे त्यामुळे बस पकडणे तसेच बस स्टॉप वरून बाहेर येणे फार जिकरीचे झाले आहे. या बस स्टॉप वरून मंत्रालय बेलाड पीएल फोर्ट फाउंटन या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी उभे असतात. तसेच सीएसटी फाउंटन फोर्ट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खाजगी कार्यालय असल्यामुळे अनेक प्रवासी आणि कर्मचारी या ठिकाणी बस पकडण्यासाठी येत असतात. परंतु त्यांनाही या अवैध बेकायदा पार्किंगचा नाद त्रास होत आहे.तरी या ठिकाणची बेकायदा वाहन पार्किंग त्वरित हटवावी अशी मागणी महापालिका कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच बेस्ट प्रवासी करत आहेत. KK.MS