पुण्यात स्थापना होणार IIM

 पुण्यात स्थापना होणार IIM

पुणे, दि. २९ महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे ७० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे, भारतीय व्यवस्थापन संस्थेची (आयआयएम) स्थापना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आयआयएम कॅम्पससाठी जागेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या देशात २१ भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई व नागपूर अशा दोन आयआयएम आहेत. आयआयएम नागपूरची शाखा सुरू होत आहे. गेले वर्षभर यासाठी पाठपुरावा सुरू होता.

उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात देशातील व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चतम संस्थेचा प्रारंभ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुणे, मुंबई व नागपुरात काही बैठकी घेतल्या. दरम्यान, महसूल मंत्री यांनी मोशी येथील ७० एकर जागेला मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘आयआयएम’च्या कामाला आता गती मिळेल. तसेच लवकरच भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना पिंपरी-चिंचवडमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *