८ तास मोबाईलपासून लांब राहिलात तर होईल या महिलेसारखा लाखोंचा फायदा! कसा विचारता? ही बातमी वाचा

 ८ तास मोबाईलपासून लांब राहिलात तर होईल या महिलेसारखा लाखोंचा फायदा! कसा विचारता? ही बातमी वाचा

मोबाईल सध्या आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. फारवेळ मोबाईल पासून आपण लांब राहू शकत नाही. पण चीनमधील एका महिलेने तब्बल ८ तास फोन वापरला नाही. उलट इतका वेळ फोन न वापरल्यामुळे ती लखपती झाली आहे. तिला १०,००० युआन (१.२लाख रुपये) बक्षिस मिळाले आहे. २९ नोव्हेंबरला चीनमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १०० जणांनी अर्ज केले होते. त्यातल्या १० जणांना एका मॉलमध्ये बोलावले होते. तसेच, त्यांना पुढील 8 तास मोबाईलशिवाय शांत राहून घालवण्यास सांगितले होते. यादरम्यान त्यांना एका नवीन प्रकारे डिझाईन केलेल्या बेडवर राहायचे होते. स्पर्धेपूर्वी त्यांचे फोन काढून घेतले. त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करण्याची परवानगी नव्हती. त्यांना वॉशरूमला जाण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा वेळ होता.
एवढंच काय, तर त्यांना बेडवरच राहून खायचं-प्यायचं होतं. त्यांना गाढ झोपायचीही परवानगी नव्हती. एका रिस्टबँडमार्फत त्यांच्या तणावाचा स्तर मोजला जात होता. काहींनी स्पर्धेत पुस्तक वाचले, तर काहींनी आराम करत वेळ घालवला. मात्र, 9 लोक बेडवर जास्त वेळ घालवू शकले नाहीत. या स्पर्धेत डॉन्ग नावाची महिला जिंकली. तिला 100 पैकी 88.99 गुण मिळाले. जिंकल्यानंतर तिने आपण घरी असतानाही जास्त फोन वापरत नाही आणि मोकळ्या वेळेत मुलांना शिकवते, असे सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *