खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास मिळणार 6 लाखांची मदत

मुंबई, दि. १४ : राज्यात अनेक रस्त्यावरील खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे आजवर हजारो नागरीकांचा मृत्यू होते. मात्र या समस्येवर सर्वांगिण उपाययोजना करण्यात येत नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन हायकोर्टानं प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून एखाद्याचा जीव गेल्यास आता मृताच्या वारसांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..तसंच जखमींना दुखापतीच्या स्वरुपानुसार 50 हजार ते अडीच लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.. हायकोर्टानं याबाबत आदेश दिले आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून अनेकदा आदेश देऊनही प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्याचे पाहायला मिळते. या आदेशांच्या पूर्ततेबबात महापालिका आणि अन्य प्राधिकरणांनी दिलेले आश्वासन कागदावरच राहिल्याचे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती नेहमीचंच झालं असून त्यासाठी पालिका अधिका-यांना जबाबदार धरले नाही, तर अशा घटना दरवर्षी होतच राहतील असंही कोर्टानं म्हटलं आहे. रस्त्यांचे निकृष्ट काम करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
SL/ML/SL 14 Oct. 2025
मुंबई, दि. १४ :
SL/ML/SL 14 Oct. 2025