संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला तर आमच्याच बाजूने

 संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला तर आमच्याच बाजूने

मुंबई, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुणालाही विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा असल्याचं सर्वांना माहित आहे. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कश्मीर ते कन्याकुमारी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.शरद पवार या पक्षाचे फाउंडर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात अशी एक अदृश्य शक्ती आहे. आता ती कॉस्मिक आहे का? न्यूक्लियर हे मला माहिती नाही.

अशी शक्ती कुठली आहे माहित नाही परंतू मुख्यमंत्री म्हणतात. त्या अदृश्य शक्ती प्रमाणे हे राज्य चालत आहे आमच्या माहितीप्रमाणे राज्य आणि देश संविधानाने चालला पाहिजे. आता अदृश्य शक्ती प्रमाणे चालत आहे असे मुख्यमंत्री म्हणतात. वास्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या युक्तीवादा दरम्यान देखील सर्व बाबी आम्ही पारदर्शकपणे मांडलेल्या आहेत .

संविधानावर आम्हाला विश्वास आहे संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने लागेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ML/KA/SL

30 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *