पुण्यात ICMAI तर्फे ‘RISE इंडिया लीडरशिप समिट 2026’ चे आयोजन

 पुण्यात ICMAI तर्फे ‘RISE इंडिया लीडरशिप समिट 2026’ चे आयोजन

पुणे, 27 : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांच्या वतीने “RISE इंडिया: लीडरशिप समिट 2026” चे आयोजन 30 जानेवारी 2026 रोजी हॉटेल विवांता, पुणे येथे करण्यात आले आहे.

या परिषदेची संकल्पना “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील धोरणात्मक नेतृत्व: मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs” अशी असून, जागतिक व्यवसाय वातावरणात कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) यांची वाढती धोरणात्मक भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे.

CMA नीरज धनंजय जोशी, उपाध्यक्ष, ICMAI यांच्या मते, भारत हा आज जगातील सर्वात मोठा ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचा केंद्रबिंदू बनला असून, हे GCCs नवोन्मेष, विश्लेषण, वित्तीय नेतृत्व व डिजिटल परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. धोरण, खर्च व्यवस्थापन, कार्यप्रदर्शन विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापनातील तज्ज्ञतेमुळे CMAs हे GCCs मध्ये धोरणात्मक भागीदार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

या समिटमध्ये उद्योगजगताचे नेते, GCC प्रमुख, वरिष्ठ वित्त तज्ज्ञ, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि CMA सदस्य सहभागी होऊन भविष्यातील नेतृत्व गरजा व जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ICMAI च्या करिअर काउन्सेलिंग व प्लेसमेंट कमिटी तर्फे, ICMAI – पुणे चॅप्टर यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. सीएमए विनय रंजन यांच्या नेतृत्वाखाली करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट समितीने हा कार्यक्रम आयोजित केल्याचेही त्यांनी नमूद केले. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *