ICC WWC 2025 साठी नेमल्या जाणार फक्त महिला अंपायर्स आणि अधिकारी

 ICC WWC 2025 साठी नेमल्या जाणार फक्त महिला अंपायर्स आणि अधिकारी

मुंबई, दि. ११ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने महिला क्रिकेटच्या इतिहासात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ICC महिला विश्वचषक २०२५ साठी केवळ महिला अंपायर्स आणि मॅच रेफ्रींची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबर २०२५ पासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू होणार असून, क्रिकेटमधील लैंगिक समतेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

या स्पर्धेसाठी ICC ने १४ महिला अंपायर्स आणि ४ महिला मॅच रेफ्रींचा समावेश असलेला पॅनल जाहीर केला आहे. भारताच्या वृंदा राठी, एन जननी आणि गायत्री वेणुगोपालन या अंपायरिंग पॅनलमध्ये आहेत, तर जीएस लक्ष्मी या माजी क्रिकेटपटू मॅच रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. या निर्णयामुळे ICC महिला विश्वचषक २०२५ ही पहिली अशी स्पर्धा ठरणार आहे जिथे सर्व अधिकारी महिला असतील.

ICC अध्यक्षांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले आहे की, महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर समान संधी देणे हे संघटनाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे महिला अंपायर आणि रेफ्रींना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून, सामने भारतातील गुवाहाटी, मुंबई, चेन्नई आणि श्रीलंकेतील कोलंबो व कँडी येथे खेळवले जाणार आहेत. भारतीय महिला संघाची नेतृत्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौर यांच्याकडे असून, उपकर्णधार म्हणून स्मृती मंधाना कार्यरत असेल. भारतात होणारी ही स्पर्धा देशातील महिला क्रिकेटला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *