गुजरातमध्ये स्थापन होणार Indian AI Research Organisation
अहमदाबाद, दि. ३० : गुजरातमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गिफ्ट सिटी येथे “इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन” (IAIRO) स्थापन करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या संस्थेची उभारणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (IPA) यांच्या त्रिपक्षीय भागीदारीत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन व विकासाला गती देणे आणि राष्ट्रीय एआय इकोसिस्टमला अधिक सक्षम करणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात सरकारने ही पुढाकार घेतली असून, देशात एआय क्षेत्रात नवे संशोधन, नवकल्पना आणि औद्योगिक प्रगती साधण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.