खरी भीमशक्ती माझ्याकडे आहे…
सांगली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीसुद्धा फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांच बंड मोठं आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
सांगली मध्ये आठवले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते.
उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
खासदार संजय राऊत म्हणतात तसे सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे, शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार 2024 पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करेल, आणि 2024 ला परत आमची सत्ता येणार आहे असे सांगून आठवले पुढे म्हणाले, आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी पक्षाचे वेगळं वेगळं नाव वापरू नये, आर पी आय हे नाव वापरावे.
वेगळं नाव वापरलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत बीजेपी 350 आणि एन डी ए 450 खासदार निवडून येणार आहेत असे सांगून आठवले पुढे म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे.
पहिले काँग्रेस जोडा, राहुल गांधी पंतप्रधान होणे अशक्य आहे असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले.
छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त, ५ आणि ६ मे रोजी कोल्हापूर येथेआर पी आयचे राज्य अधिवेशन आयोजित केले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आठवले यांनी यावेळी दिली.
ML/KA/SL
2 Jan. 2023