कृतज्ञ मी, कृतार्थ मी

ठाणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्या प्रसारक मंडळ संचलित जोशी – बेडेकर (स्वायत्त) महाविद्यालय, ठाणे आयोजित मधुबिंब निर्मित ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ हे दोन अंकी नाटक, शुक्रवार , २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालय परिसरातील पाणिनी सभागृहात सादर होणार आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या पुढाकाराने सदर प्रयोग आयोजित करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अराजकीय प्रवास या विषयावर आधारित नाटक असून अनंत शेखर ओगले यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. यतिन ठाकूर दिग्दर्शित या नाटकात स्वतः यतिन ठाकूर आणि सायली सांभारे कलाकाराच्या भूमिकेत आहेत. नाटक सर्वांसाठी खुले आहे असे डॉ. मुग्धा बापट , सांस्कृतिक विभाग प्रमुख
जोशी – बेडेकर (स्वायत्त) महाविद्यालय, ठाणे यांनी कळविले आहे.
SL/KA/SL
22 Nov. 2023