राज्यासमोर हायड्रो गांजांचे मोठे आव्हान

मुंबई, दि. ३ : विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर सविस्तर चर्चा झाली. राज्यासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन जिचकर नावाच्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली आणि तो थायलंड व अमेरिकेतून कुरियरद्वारे भारतात पाठवत होता. या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग आढळून आला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतील काही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून काहींवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीत शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही वापर झाल्याचे समोर आले आहे, कारण त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. केवळ तस्करच नव्हे, तर पुढील लिंक शोधणेही अनिवार्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
“केवळ तस्कर नाहीतर पुढील लिंक शोधणेही अनिवार्य असल्याचं फडणवीस म्हणाले.” पाच दिवसांपूर्वी गुप्तचर माहितीच्या आधारे दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २१ किलो हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत २१ कोटी ५५ लाख रुपये आहे. अंमली पदार्थांच्या गुन्हेगारांना केवळ एनडीपीएस कायद्यांतर्गत नव्हे, तर मकोका (MCOCA) अंतर्गत अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी या अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.