मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~

मुंबई दि.2 ~ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुमिका अत्यंत स्वागतार्ह असून मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे पाठीराखे ठरले आहेत.मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वात आधी मी संसदेत मागणी केली होती.गरीब मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आमची भूमिका होती. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी केली त्या काळात राज्यात काँग्रेस चे सरकार होते.काँग्रेस सरकार च्या काळात 99 टक्के मराठा समाजाचे नेते सत्तेत होते.मात्र त्यावेळी काँग्रेस च्या मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.आता मात्र मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणांच्या मागणीसाठी सर्व मराठा समाजाचा एकजूट झाला.मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचा आणि ते आरक्षणा न्यायालयात टिकणारे असावे यासाठी प्रयत्न केले. हैदराबाद गॅझेट लागू आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून हा निर्णय गरीब मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय आहे.मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला योग्य प्रतिसाद राज्य सरकार ने दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनोज जरांगे यांनी आभार मानून मराठा आरक्षणाचा पाठीराखा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे ही अभिनंदन केले पाहिजे असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या शब्दावर हजारो लाखो आंदोलक मुंबईत आले.त्यांनी तीव्र आंदोलन करीत मुंबई जाम केली.आम्ही खैरलांजी गावातील अन्यायाच्या विरोधात केलेल्या आंदोलनावेळी तेव्हाच्या काँग्रेस सरकारने आम्हाला नागपुरातच रोखले.मला आणि प्रकाश आंबेडकर ;जोगेंद्र कवाडे आम्हला त्याकाळात अटक करून काँग्रेस सरकारने आमचे आंदोलन रोखले.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली भूमिका घेऊन मुंबईत आझाद मैदानात 5 हजार आंदोलकांसह मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली.त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुमिका नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी गरीब मराठा आरक्षणाचा पाठीराखा म्हणूनच राहिली आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.
मराठा नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्याआधी मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले होते. एक मराठा लाख मराठा म्हणत लाखोंचे मोर्चे मूक मोर्चे होते.फक्त काही मुली मोर्च्यात निवेदन वाचून दाखवत होते.ते मूक मोर्चे म्हणजे एक आदर्श आंदोलन होते. आता मनोज जरांगे यांनी केलेले आंदोलन ही .मराठा समाजाला जागृत करणे आंदोलन आहे.मात्र त्यांनी आंदोलनात वापरलेली भाषा संयमाची हवी होती.त्यांनी आता कुणाला ही एकेरी मध्ये बोलू नये.आम्ही सुद्धा आंदोलन केले आहे.मात्र कधीही कुणाला एकेरीत बोलणं अपशब्द वापरले नाहीत.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.त्यांनी आता संयम ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असे ना. रामदास आठवले म्हणाले.KK/ML/MS