झोपडीवासियांना आता अडीच लाखात घर
![झोपडीवासियांना आता अडीच लाखात घर](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/05/HUT.jpg)
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडी धारकांसाठी राज्य सरकराने मोठी भेट दिली आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. झोपडी धारकांना झोपडच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय जारी झाल्याने लाखो कुटुंबियांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चिती करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय आज जाहीर केला. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाचं पुनर्वसन करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत घेतलेला या निर्णय महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
SL/KA/SL
25 May 2023