या देशात गेब्रिएल चक्रीवादळाचे थैमान

 या देशात गेब्रिएल चक्रीवादळाचे थैमान

ऑकलंड,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीचे सत्र अखंडपणे सुरू आहे. न्यूझीलंडमध्ये गेब्रिएल चक्रीवादळाचा  धोका निर्माण झाला आहे. यामुळे जवळपास 509 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारी देशाच्या उत्तर भागात 250KM वेगाने वारे वाहत आहेत. ऑकलंड शहरात सध्या वाऱ्याचा वेग ताशी 110 KM आहे. उत्तर भागातील सुमारे 46 हजार घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

 मुसळधार पावसाला सुरूवात

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. ऑकलंडमध्ये गेल्या 24 तासात 4 इंच पाऊस झाला आहे. येथील समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. न्यूझीलंडच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गॅब्रिएल चक्रीवादळ नुकतेच जमिनीवर आले आहे. दरम्यान, वीजवाहिन्या, रस्ते आणि झाडे पडून नुकसान झाले आहे. पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे.

सरकार इर्मजन्सी लागू करण्याची शक्यता

आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी म्हणाले- पुढील 24 तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार आणीबाणी लागू करण्याचा विचार करत आहे. न्यूझीलंडच्या इतिहासात वादळामुळे आणीबाणी जाहीर होण्याची ही तिसरी वेळ असेल.

पंतप्रधानांनी मदतीचे पॅकेज केले जाहीर

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी या वादळाला धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मदतीसाठी 60 कोटी 37 लाख 83 हजार रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. यासोबतच किनारपट्टीलगतच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.

Hurricane Gabriel hit the country

ML/KA/SL

13 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *