“शुक्रिया मोदीजी” म्हणत शेकडो मुस्लीम महिलांनी पाठविले आभार पत्र..

बुलडाणा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारने तीन तलाक संदर्भात आणलेल्या कायद्यामुळे मुस्लिमांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहेत प्रधानमंत्री आवास योजना मातृत्व वंदन योजना, कृषी सन्मान योजना यासारख्या अनेक योजनांचा मुस्लिमांना मोठा फायदा झाला आहे केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजांना होत असल्याने केंद्र सरकार बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलढाणा येथे मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शुक्रिया मोदीजी अश्या आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी चिखली शहर आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोदी सरकारने लागू केलेल्या या असंख्य योजना आम्हाला आमचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरल्या असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
ML/KA/SL
7 March 2024