चीन सरकारने बंद केल्या शेकडो मशिदी

 चीन सरकारने बंद केल्या शेकडो मशिदी

शिंजिंयांग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील मशिदींमध्ये संशयास्पद घडामोडी घडत असल्याचा संशय व्यक्त करत चीनने देशातील शेकडो मशिदीं बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. जगभरातील मुस्लीम देशांशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करत चीनचे मुस्लिम देशांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. पाकीस्तान सारख्या देशाला भरपूर आर्थिक मदत देऊन चीन या देशात हस्तक्षेप करत आहे. असे असतानाही मुस्लीमांना सर्वात जास्त अत्याचार चीनमध्येच सुरु आहेत. असे चित्र दिसत आहे.

चीनने आपल्या देशातील शेकडो मशिदी बंद केल्या आहेत किंवा त्यांच्या रचनेमध्ये बदल केले आहेत. एका रिपोर्टनुसार चीनने निंग्जिया आणि गांसु क्षेत्रातील मशिदी बंद केल्या आहेत. या क्षेत्रात शिनजियांगनंतर सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहेत.

ह्यूमन राइट्स वॉच (HRW) च्या संशोधनकर्त्यांनी सांगितले की, चीन सरकार निंग्जिया आणि गांसु क्षेत्रातील मशिदींची संख्या कमी करत आहे. चीनच्या या कृत्यानंतरही इस्लामिक देश आणि OIC ने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मुस्लिमांचा मसीहा म्हणून घेणाऱ्या पाकीस्ताननेही यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

ह्यूमन राइट्स वॉच रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २०२० नंतर १३०० मशिदी नष्ट करण्यात आल्या आहेत किंवा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या चीनमधील एकूण मशिदीच्या एक तृतियांश आहेत. याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एचआरडब्ल्यूच्या रिपोर्टमध्ये २०२० पूर्वी नष्ट केलेल्या मशिदींचा समावेश नाही.

चीनी अधिकारी मशिदींमधील स्थापत्य शैली नष्ट करत आहेत. जेणेकरुन त्या चीनप्रमाणे दिसाव्यात. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष धर्मावरील आपले नियंत्रण घट्ट करण्यासाठी आणि त्याच्या राजवटीला येणार्‍या संभाव्य आव्हानांची जोखीम कमी करण्यासाठी दडपशाही मोहीम राबवत आहे आणि मशिदींसंबंधीचे हे प्रकार त्या मोहिमेचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे.

ह्यूमन राइट्स वॉचनुसार, चिनी अधिकाऱ्यांनी शिंजियांगच्या बाहेरील भागात इतर वापरासाठी मशिदी बंद केल्या आहेत, तसंच पाडल्या आहेत किंवा त्याना नवं रुप दिलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अद्याप मौन बाळगलं आहे.

SL/KA/SL

22 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *