शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

 शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे. 

वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाइन टाकली होती. पण वीस वर्षांनंतर या भागात लोकवस्ती वाढ झाली़ पण ड्रेनेज लाइन मात्र तीच आहे. ड्रेनेजचे पाणी वाहून नेणारी लाइन मात्र कमी पडत आहे. त्यामुळे ड्रेनेज फुटण्याचेही प्रमाण वाढले आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज लाइन फुटल्याने पाणी थेट शिवाजीनगर येथील तलावात मिसळल्याने तलावातील पाणी प्रदूषित होऊन शेकडो माशांसह अन्य जलजीव मृत्यू पडल्याची घटना समोर आली आहे.

Hundreds of fishes died in Shivajinagar pond

ML/ML/PGB
27 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *