देशाला मिळणार भरपूर सोनं! राजस्थानातील बांसवाडा शहरात सापडला मोठा साठा
![देशाला मिळणार भरपूर सोनं! राजस्थानातील बांसवाडा शहरात सापडला मोठा साठा](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240625-WA0016-850x550.jpg)
देशाला आता भरपूर सोनं मिळणार आहे. कारण राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. ही खाण भविष्यात देशाला २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला परवाना मिळाला आहे. तर इतर ब्लॉक परवान्यांमध्ये मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नेच्युरल रिसोर्सेस लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे.
या सोन्याच्या खाणीतून इतरही अनेक खनिजे काढली जाणार आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथील भागात ९४०.२६ हेक्टरमध्ये ११३.२ मिलियन टन सुवर्ण भांडार सुरुवातीच्या टप्प्यात सापडू शकते, असे म्हटले जाते आहे. यात जवळफास २२२.३९ टन सुवर्ण धातू असण्याची शक्यता आहे.