शेअर बाजारात प्रचंड तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ३ लाख कोटी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षांच्या दुसऱ्याच आठवड्यात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची भरभराट झाली आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांचे या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले. गुंतवणूकदारांनी आज एका दिवसात 3 लाख कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ हे या तेजीचे कारण आहे. त्यामुळे सेन्सेक्सने 847 अंकांची उसळी घेतली. निफ्टी पहिल्यांदा 21,900 च्या पुढे बंद झाला. इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांमुळे आज बाजारात उत्साहाचे वातावरण होते. Huge boom in stock market investors earned 3 lakh crores
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 7.97 टक्के वाढ झाली. यानंतर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 3.92 टक्के ते 4.84 टक्के वाढीसह बंद झाले.तर उर्वरित 10 सेन्सेक्स शेअर घसरणीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडचे शेअर्स 0.93 टक्क्यांनी घसरले. तर बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर 60.40 टक्के ते 0.91 टक्क्यांपर्यंत घसरून लाल रंगात बंद झाले.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 373.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे गुरुवार 11 जानेवारी रोजी 370.47 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 2.97 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.97 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.28 टक्के आणि 0.42 टक्के वाढले. तर सेक्टरल इंडेक्समध्ये आयटी शेअर्सचा निर्देशांक 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि एनर्जी शेअर्सचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 847.27 अंकांनी किंवा 1.18 टक्क्यांनी वाढून 72,568.45 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 260.80 अंक किंवा 1.20 टक्क्यांच्या वाढीसह 21,894.55 च्या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान बीएसई सेन्सेक्स 72,720.96 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता आणि NSE निफ्टीने 21,928.25 अंकांच्या विक्रमी उच्चांक गाठला होता.
SL/KA/SL
12 Jan. 2024