राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के

मुंबई दि ५– राज्यात बारावीचा एकूण निकाल 91.88 टक्के इतका लागला असून
राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल 1.49 टक्क्याने घसरला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी पहायला मिळाली. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
ML/MS