पांढऱ्या सोन्याला आली झळाळी!
यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अर्थातच कापसाला यवतमाळ जिल्ह्यात प्रति क्विंटल ९००० च्या वर भाव मिळत आहे .ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन मात्र सरासरीपेक्षा घटलेले आहे. However, cotton production is lower than average.
ज्यावर्षी उत्पादन घटते त्यावर्षी भाव वाढतात. किंबहुना ज्या वर्षी भाव वाढतात त्यावर्षी उत्पादन नसते ही दुष्ट मालिका गेली अनेक वर्षे अशीच सुरू आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला की त्याचे दर पुन्हा वाढतात .ही सुद्धा सल शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. याबाबत शासनाने ठोस उपाय करावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ML/KA/PGB
22 Nov .2022