नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

 नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

दिनांक २१ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजून ५३ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४५ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “शोभन” आहे.
या संवत्सरात चांगला पाऊस,धनधान्यात वृद्धी,सर्वत्र हर्ष व उल्लासाचे वातावरण पसरेल,शुभ फळांची वाढ होईल, पृथ्वीवरील धनात वाढ होईल पण रोगांचे प्रादुर्भाव वाढतील.
नवीन वर्षाची पत्रिका ही वृश्चिक लग्नाची आहे. चतुर्थस्थानी शनी हा कुंभेत,स्वराशीचा आहे,पंचमस्थानी रवी,चंद्र,,बुध,गुरु, नेपच्यून षष्ठ स्थानी शुक्र,राहू,व हर्षल,अष्टमस्थानी मंगळ,तर व्यय स्थानी केतू असे ग्रह आहेत.
मागील वर्षी नमूद केल्याप्रमाणे कोरोनासारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात भारत यशस्वी झाला. व हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत सुरु झाल्या.

आगामी वर्ष आपल्या देशाला कसे जाईल ?

हे वर्ष सत्ताधारी पक्षाला हे वर्ष त्रासाचे/कटकटीचे राहील, पोटनिवडणूकीत हार होईल.बऱ्याच अंशी विरोधी पक्षाच्या मनासारख्या गोष्टी होतील. काही राज्यात मध्यावधी निवडणूकांची शक्यता. सरकार व विरोधी पक्षातील सलोखा सातत्याने कमी होताना दिसेल. राजकारणात हेवेदावे ,मत्सर वाढतील,अचानक काही राजकीय संकटे निर्माण होतील.काही पक्षातील लोक फुटतील. काही पक्षांची युती संपुष्टात येईल. प्रमुख नेत्यांच्या जीवाला धोका संभवतो. काही राजकारण्यांचे घोटाळे उघडकीस येतील

शिक्षण संस्था,विद्यार्थी, कलाकार,नाट्य,संगीत,चित्रपट व्यवसाय,खेळ यांना अनुकूल

पंचमातील शुभ ग्रहांमुळे शिक्षण संस्था,विद्यार्थी, कलाकार,नाट्य. संगीत क्षेत्र, खेळ तसेच चित्रपट व्यवसाय या करिता अनुकूल राहील. नवीन शाळा तसेच कॉलेज यांची निर्मिती होईल, परंतु शैक्षणिक क्षेत्रात काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे देखील दिसेल.

नाट्यगृहे,मनोरंजनाची साधने,खेळाची भरभराट होईल. या क्षेत्रातील लोकांची मान-प्रतिष्ठा वाढेल.जनतेचा कल देखील या क्षेत्राकडे आकर्षिला जाईल. पण त्याचबरोबर क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील काळी बाजू शोषण,घोटाळे उघडकीस येतील.त्याचबरोबर नाट्यव्यवसाय तसेच शैक्षणिक बाबतील काही वाद देखील निर्माण होतील. कलाकारांचे घटस्फोट,ब्रेकअप्स यात वाढ होईल.
स्त्रीवर्ग/कलाकार,विशेषतः स्त्री कलाकारआजारी पडतील,त्याच्या वर आरोप गुन्हे दाखल होतील,काही स्कँडल बाहेर पडतील.

या वर्षी जन्मदर वाढताना दिसेल.

स्त्रिया व मुलांचे शोषण तसेच अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतील.

दळण वळणाची साधने रेल्वे,बस,तसेच पोस्टऑफिस, तारसेवा, फोनसेवा यात नवीन व आशादायी सुधारणा होऊन जनसंपर्क सुधारण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल होताना दिसतील त्याचबरोबर अपघात,दुर्घटना,अग्निकांड,कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संप तसेच असंतोष याचे प्रमाण वाढेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलाचे प्रमाण वाढेल. नवी रस्ते बांधणीची कामी सुरु होतील. रेल्वेचे मोठे अपघात तसेच स्फोट होण्याची शक्यता.

ह्या वर्षी देखील देशात/जगात नैसर्गिक आपत्ती/संकटे येतील(Natural disasters)

या वर्षी हवामानात विचित्र बदल होताना दिसतील,नैसर्गिक आपत्ती,वादळे,पिकांची हानी होताना दिसेल. नवीन व विचित्र/अनाकलनीय रोग पसरतील.
अग्निप्रलय, भूकंप, स्फोटक घटना,खाणीत अपघात.वीज पडून/लागून मृत्यू,दरड कोसळणे/ अश्याघटनाघडतील.विहिरी,तलाव,यातअपघात.मिलटरीच्याअधिकाऱ्यांना,डॉक्टर्स,विशेषतःशस्त्रक्रिया करणारे,सर्जन,युद्धतज्ञयांना,प्रतिकूल/मृत्यू.

खेळाडूंवर टीका/टिप्पणी/आरोप/कारवाया होण्याची शक्यता अधिक आहे. ज्येष्ठ खेळाडूंचा मृत्यू होण्याची शक्यता.

देशातीलसैन्य,आरमार,पोलीस,मिलिटरी,आर्मी,नेव्ही,यांनाप्रतिकूल,कारखानदार/उद्योगपटूयांना
प्रतिकूल./मृत्यू होण्याची शक्यता.अग्नीप्रलय/अग्निकांड व अपघाताने मृत्यू, हिंसा, यात वाढ होईल. राजकीय व्यक्ती आजारी पडतील. कारखान्यात काम करणारे लोग तसेच,मजूर वर्ग यामध्ये चळवळी तसेच संप होतील. लेखक,प्रकाशक यांच्यासाठी प्रतिकूल.

सेना लष्कर,मिलिटरी यावरती हल्ले होतील, अतिरेकी संघटना आक्रमक होतील. सीमेवर चीन किंवा पाकिस्तान यांच्या कुरापती/षडयंत्र/आतंकवादी घटना /हल्ले वाढतील.

या वर्षी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील.
मुंबई,कोकण,कोल्हापूर,सांगली,गोवा,विदर्भातील काही भाग,दक्षिणेकडील राज्ये,बिहार,आसाम,उत्तर प्रदेश या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता.

शेअर मार्केट
मार्केटमध्ये तेजी होईल परंतु ती फसवी असेल, मार्केट नवीन विक्रमी उच्चांक देखील गाठू शकेल. मोठ्या प्रमाणात चढउतार तसेच बरीच अस्थिरता देखील जाणवेल.या वर्षी बऱ्याच वेळेला अंदाज चुकतील. मोठा(सामूहिक) फ्रॉड उघडकीस येईल.बँकिंग क्षेत्रास त्र्यासदायक ठरेल,अडचणींचा सामना करावा लागेल.अर्थव्यवस्था डळमळीत होईल. गुप्त शत्रू आर्थिक व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील. काही आर्थिक घोटाळे बाहेर येताना दिसतील. युरोपियन तसेच अमेरिकन मार्केट मध्ये बरीच अस्थिरता जाणवेल.

ग्रहणे
या वर्षी २० एप्रिल व १४ ऑक्टोबर रोजी सूर्य ग्रहण तर ५ मे व २८ ऑक्टोबर रोजी चंद्र ग्रहण होतील.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ

के. पी. विशारद ,नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *