वीज बिल नेमके कमी कसे करावे? जाणून घ्या हा पर्याय…

 वीज बिल नेमके कमी कसे करावे? जाणून घ्या हा पर्याय…

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेंतर्गत वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, केवळ ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’चे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय उपलब्ध करून दिला. हा पर्याय निवडणाऱ्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील पर्यावरणस्नेही १३ हजार ५३९ ग्राहकांकडून १६ लाख २४ हजार ६८० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीज ग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होते.

वीजबिल तयार झाल्यानंतर ते संगणकीकृत प्रणालीद्वारे गो-ग्रीन ग्राहकांना ईमेलद्वारे त्वरित पाठवले जाते. याशिवाय ग्राहकांना वीज बिलाची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’ पर्यायाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होते. यावेळी ‘गो-ग्रीन’ योजना अत्यंत आवश्यक आहे. अकोला परिमंडळ वीज ग्राहकांनी या योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे असे आवाहन करते.

अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला जिल्ह्यात पाच हजार १४५ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सहा हजार ०३८ ग्राहक, तसेच वाशीम जिल्ह्यातील दोन हजार ३५६ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे.

How to reduce electricity bill exactly? Explore this option…

ML/KA/PGB
30 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *